भारतीय प्रादेशिक भाषांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा – सकाळ
कर्मवीर शांतारामबापू वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संगणक विभागातर्फे “वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर’ या विषयावर सुनील खांडबहाले यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते म्हणाले, भारतीय प्रादेशिक भाषांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर हे सर्वांना उपयुक्त ठरत आहे.