मराठी भाषा स्पेलचेकर, नाशिकच्या सुनील खांडबहाले यांचे संशोधन – लोकसत्ता
मराठी शुध्दलेखनाविषयी अनेक प्रवाद आहेत. शुध्दलेखनात वेगवेगळी पध्दत अंगीकारली जात असल्याने नियम कोणते वापरावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब लक्षात घेऊन येथील संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी सुलभ पध्दतीने शुध्दलेखन तपासणीसाठी सहाय्यभूत ठरेल अशी खास ‘शुध्दलेखन तपासक संगणक प्रणाली’ विकसित केली आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता कोणालाही ही प्रणाली सहजपणे वापरता येईल. इंग्रजी ‘स्पेलचेकर’च्या धर्तीवर या प्रणालीची रचना आहे.