अखंड ज्ञानेश्वरी पारायण वेबसाईट

पुणे ज्ञानेश्वरी रेडिओ या इंटरनेट रेडिओचे उद्घाटन परम महा संगणकाचे जनक पद्मभूषण डॉक्टर श्री विजय भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
या वेळी डॉ भटकर म्हणाले की या रेडीओ मुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा, अखिल विश्वाला उपलब्ध झाला आहे.


ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, ही श्री ज्ञानराज माउलींची वाङ्मयमूर्ती आहे . श्री ज्ञानराज माउलींनी हा ग्रंथ संजिवन समाधीमध्ये आपल्यासमोर ठेवला आहे. मानवी जीवनात या ग्रंथाचे पारायणास अतीव महत्व आहे. या ग्रंथाचे पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होवून मनाच्या स्थिरतेद्वारा सात्विक निरतिशय रम्य समाधानाची प्राप्ती होते असा थोरामोठ्यांचा अनुभव आहे.
या धकाधकीच्या वेगवान कालामध्ये सात्विक निरतिषय रम्य समाधान प्राप्ती साठी श्री ज्ञानेश्वरीचे पारयण करण्याची अनेकांची ईच्छा असते पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी ज्ञानेश्वरी रेडीओ ही सुविधा लवकरच उपलब्ध आहे.
ज्ञानेश्वरी रेडीओ हा ईंटरनेट रेडीओ आहे . ही सुवीधा सकल जनांसाठी साठी अव्याहतपणे (24*7)उपलब्ध असणार आहे . या सुविधेचा लाभ आपणास जगाच्या पाठीवर कोठेही मिळू शकणार आहे.
या रेडिओचे माध्यमातून ज्या घराण्यास हा प्रासादिक ग्रंथ साक्षात श्री ज्ञानराज माउलींकडून प्रदत्त आहे.ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या अनुशंगाने 50हून अधीक ग्रंथ अभिव्यक्त झाले आहेत अशा डॉ श्री किसनमहाराज साखरे यांनी व्रतस्थ व सांप्रदायिक पद्धातीने केलेल्या संपूर्ण ,सांप्रदायिक ,शुद्ध , ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ मिळणार आहे.हे पारायण श्री साखरेमहाराजांनी उपवासादि व्रतांचा अंगीकार करून व्रतस्थतेने केले आहे. या पारायणामध्ये सात्विक वद्यांचे सहाय्य घेतले असून जयजयवंती रागामध्ये संपूर्ण ग्रंथाचे पारायण केलेले आहे . या पारायणाचे अत्याधुनिक उच्च तंत्रज्ञानाचे माध्यमातून जतन करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी रेडीओ आपल्या भेटीसाठी आहे तरी सात्विक निरतिषय रम्य समाधानप्राप्तीसाठी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा .
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील वेबसाइटला भेट द्यावी ज्ञानेश्वरी अखंड पारायण.
श्रवणासाठी संकेतस्थळ :-
१. https://radio.garden/listen/dnyaneshwari/wNaxBWvK
२. https://zeno.fm/dnyaneshwari
उपरोक्त दोहोंपैकी कोणतेही एक संकेतस्थळ आपल्या स्मार्टफोन, संगणक अथवा टॅब्लेट आदि वर उघडल्यास लागलीच ज्ञानेश्वरी पारायण सुरू होईल. अथवा सोबत दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करावा .
या वेळी श्री यशोधन साखरे श्री सुनिल खांडबहाले श्री नचिकेत भटकर श्री सारंग राजहंस श्री चिदंबरेश्वर साखरे श्री नचिकेत कंकाळ हे मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *