गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा

Sunil Khandbahale on Guru
Sunil Khandbahale on Guru
दोन प्रकारचे विकास असतात. एक बुद्धिविकास आणि दुसरा हृदयविकास. बुद्धिविकास करते ते शिक्षण आणि हृदयविकास करते ती संस्कृती. सुशिक्षित माणसे सुसंस्कृत असतातच असे नाही. तंत्रज्ञान व्यापक व निष्पक्ष असल्याने बुद्धिविकासात सहाय्य्यभुत जरूर ठरत आहे. परंतु इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की – तंत्रज्ञान हाताळताना ते हाताळणाऱ्याकडे विवेक असणे पूर्वावश्यक आहे. याउलट गुरु मात्र अज्ञानी शिष्याचा सद्सदविवेक जागृत करतात. गुरु या शब्दातील ‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा. हृदयविकास प्रक्रियेत प्रत्यक्ष गुरुची भूमिका महत्वाची आहे. माझ्या मते तंत्रज्ञानाकडे सहाय्यीभूत म्हणून बघणेच इष्ट ठरावे कारण बुद्धी आणि हृदय यांचा समप्रमाणात विकास झाला तर आणि तरच मानवी जीवनाचे व मानवी संस्कृतीचे आदर्श रूप प्रत्यक्षतेत-समक्षतेत अवतरेल.
– सुनील खांडबहाले
संशोधक, स्लोन फेलो इन इन्होवेशन अँड ग्लोबल लीडरशिप
मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोस्टन. अमेरिका. 
Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *