मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला ‘डिजिटल पर्वा’त आणण्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक काम एका संशोधक वृत्तीच्या ग्रामीण मराठी मुलाने केल्यामुळे बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट, त्याचप्रमाणे ‘गुगल’ही प्रभावित होऊन त्यांनी सुनील खांडबहाले या मराठी तरुणाला विविध ‘ऑफर्स’ देऊ केल्या आहेत.अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे कॉम्प्युटर, मोबाइल-डिक्शनरी/थिझारस यांना एकवटण्याचे काम मराठी भाषेत प्रथमच झाले असून, सुनीलला दिवसाला एक लाख ‘हिट्स’ जगभरातून मिळत आहेत. आयपॅड, आयपॉड, कोंडल, ब्लॅकबेरी, थ्रीजी, फोर-जीच्या या जमान्यात सुनील खांडबहालेने एकदम हनुमान उडी घेतली आहे.