इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ

पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्यावर संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारासाठी चोवीस तास व सातही दिवस अव्याहतपणे सुरू राहील असा ‘संस्कृत-इंटरनेट-रेडिओ’ ऑनलाइन प्रसारित केला.

Sanskrit Radio News Maharashtra Times
Sanskrit Radio News Maharashtra Times

या रेडिओमध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र-संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद, विषयवार धडे, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तू-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीते, कविता, सुभाषिते असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटेरनेटवर हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अॅप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफोन, टॅब्लेट तसेच संगणकावर संस्कृत इंटरनेट रेडिओ श्रवणाची सुविधा असल्याने श्रोत्यांसाठी अधिक सोयीचे आहे. नजिकच्या काळात सर्वसमावेशक व दर्जेदार कार्यक्रम निर्मितीसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ शकतील व अभिव्यक्त होऊ शकतील अशी योजना असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगितले. www.khandbahale.com/sanskrit किंवा https://tinyurl.com/sanskritradio या संकेतस्थळावर संस्कृत रेडिओ ऐकण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहे. विषयतज्ज्ञ आणि संस्कृतप्रेमींनी याबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन खांडबहाले यांनी केले आहे.

संस्कृत स्तोत्र, श्लोक, गीते अनेक वेबसाइट्सवर अस्ताव्यस्त स्वरुपात उपलब्ध आहेत. परंतु, व्यावहारिक जीवनाशी संबंध सांगता येईल, असे संवादात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन-संकलित करणे आणि २४ तास अव्याहत श्रवण करता येऊ शकेल, इतके सुसह्य करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे मी इंटरनेट रेडिओ तयार केला.

-सुनील खांडबहाले

संचालक, खांडबहाले डॉट कॉम भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्था

News Link

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/sanskrit-radio-is-now-available-on-the-internet/articleshow/70717022.cms

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *