‘गोदावरी आरती’ संकेतस्थळाचे लोकार्पण

जगभरात जल प्रदूषणाची Water Pollution मोठी समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानवास होणारे 80% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष वॉटर इन्होवेशन अर्थात जल-संशोधनाकडे वळविणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपली जावी यासाठी नाशिकमधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय 22 राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले Sunil Khandbahale यांनी गोदावरी-आरती.ऑर्ग godavariarti.org या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

साहित्य, कला-संगीत यामध्ये प्रत्येकासच साद घालण्याची क्षमता असल्याचे ओळखून या वेबसाईटवर गोदावरीची Godavari River भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महती गाणारी गोदावरी आरती आधुनिक काळातही नवतरुणांना सहज समजेल अशा पद्धतीने त्यांनी शब्दबद्ध केली आहे. इन्फोसिस तसेच ऍक्सेंचर अशा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उच्च्पदस्थ असलेल्या गायकांनी तसेच अनेक कलावंतानी गायलेली गोदावरी आरती संकेतस्थळावर ऐकायला मिळणार आहे

नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनामनांत संचारली पाहिजे.

– सुनील खांडबहाले, तंत्रज्ञ, खांडबहाले.कॉम

वैश्विक उर्जेत सहभागी होताना समष्टिप्रमाणेच व्यष्टी म्हणजेच व्यक्ती स्वरूपात सहभाग नोंदविल्यास सकारात्मक ऊर्जा अनुसंधान होईल.

– सचिन चंद्रात्रे, शास्त्रीय गायक

गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणार्या नवीन पिढीसाठी माता गोदावरी हा एक नवीन संस्कार पेरूया.

– श्रीपाद खैरनार, तंत्रज्ञ, इन्फोसिस

साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूया.

– निलेश म्हात्रे, तंत्रज्ञ ऍक्सेंचर.

deshdoot https://www.deshdoot.com/local-news/nasik/inuguration-of-godavari-aarti-website

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *