आपली मातृभाषा ही आपली ओळख आहे.

राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं  संवर्धन व्हावं या हेतूनं  दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागानं एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा - सुनील खांडबहाले
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – सुनील खांडबहाले

“माझा मराठीची बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके..” अशा आपल्या मायमराठी भाषेच्या संवर्धनासाठी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करावा लागणे ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. “माझा मराठीची बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके..” अशा आपल्या मायमराठी भाषेच्या संवर्धनासाठी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करावा लागणे ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. कारण मायमाऊलीचा जयघोष करण्यासाठी सण-वार-तिथी, आदेश, अथवा परिपत्रकाची गरज असावी का? असो.

दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभाग, राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. यानिमित्ताने मी आपणांस सांगू इच्छितो की, मायमराठीचे संवर्धन आणि प्रचार-प्रसार व्हावा यासाठी, कालानुरूप जगातील सर्वप्रथम मराठी संगणकीय शब्दकोश खांडबहाले.कॉम ने २००० मध्ये निर्माण केला, त्यानंतर जगातील पहिला मराठी डिजिटल ऑनलाईन शब्दकोश (२००५), जगातील पहिला मराठी मोबाईल शब्दकोश अँप स्वरूपात (२००८) आणि जगातील पहिला मराठी शब्दकोश लघुसंदेश अर्थात एसएमएसवर (२०१२) मध्ये सुरु केला. मागील २२ वर्षांच्या कालखंडात भारत व भारताबाहेरील विषयतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ यांना एकत्र करून मराठीसोबतच इतर २२ भारतीय राजभाषांचेही संगणकीकरण करून त्यांचे डिजिटल स्वरूपातील शब्दकोश बनविण्यासाठीचा पुढाकार खांडबहाले.कॉम ने घेतला. संगणक, मोबाईल, वेबसाईट, अँप्स हे सर्व तंत्रज्ञान आम्ही कोणत्याही सरकारी अनुदान अथवा मदतीशिवाय लोकसहकार्यातून पूर्ण केले. असे असूनही कोणताही मोबदला न घेता निस्वार्थी भावनेने सर्व सेवा जनहितार्थ विनामूल्य व विनानोंदणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जगभर या प्रयोगाचे स्वागत झाले, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्टीय पुरस्कार मिळाले. जगभरातून मराठी बांधवांनी शुभेच्छांचा अगदी वर्षाव केला, हीच आमच्या कामाची खरी पावती आहे. आजमितीला जगभरातून म्हणजे जवळपास १५० देशांतून १५ कोटींहून अधिक लोक भाषांतर करण्यासाठी अथवा भाषा शिकण्यासाठी नित्याने खांडबहाले.कॉम चा वापर करतात. यातून भारतीय भाषांप्रति जगाला असलेले आकर्षण सिद्ध होते. आपली मातृभाषा हि आपली ओळख आहे, अभिमानाने ती मिरवा. मी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकन लोकांसमोर इंग्रजी येत असूनही मुद्दामहून मराठी भाषेत भाषणाला सुरुवात केली, त्याचे फार कौतुक झाले, अनेकांनी मराठी भाषेविषयी मोठ्या आस्थेने चौकशी केली आणि विशेष म्हणजे माझे भाषण संपल्यावर सिलिकॉन व्हॅलीत काम करणाऱ्या शेकडो उच्चशिक्षित मराठी बांधवांनी माझ्याभोवती गर्दी केली. मित्रांनो भाषा आपल्याला एकसंध ठेवते. अनेक परदेशस्थ भारतीय आपल्या मायबोलीला मुकले असल्याचे मी अनुभवले आहे. त्यांची नवीन पिढी आणि जुनी पिढी यामध्ये भाषेचा अडसर असल्याने ना आजोबा-आजीला नातवंडांसाठी मायेचा ओलावा टाकता येतो, ना मुलं त्यांच्यात रमतात. भारतात आल्यावर त्यांना फक्त बोर होतं अशा अनेक परदेशी पालकांच्या समस्या मी ऐकल्या आहेत. त्यामुळे तिकडे मराठी शाळा सुरु कराव्या लागल्या आहेत. आपले बहुत सुकृत असावे म्हणून आपण, आपली मुलं मराठी जगतात आपल्याला जन्म मिळाला. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”  या उक्तीप्रमाणे आपले देखील नागरिक या नात्याने आपली माता, मातृभूमी आणि मातृभाषेसाठी काही कर्तव्य आहे, सर्व काही शासनानेच करावे अशी अपेक्षा योग्य नाही. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, तिचे संवर्धन व्हावे यासाठी खांडबहाले.कॉम या संकेतस्थळाच्या व प्ले स्टोअरवरील अँप्सच्या लिंक इथे देत आहोत. 

ऑनलाईन वेब: https://www.khandbahale.com/language/marathi/ 
स्मार्टफोन अँप: https://play.google.com/store/apps/details?id=com.khandbahale.android.english_to_marathi_dictionary 

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *